कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वेला पाच नवीन थांबे; आठवड्यातून पाच दिवस धावणार संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वेला पाच नवीन थांबे; आठवड्यातून पाच दिवस धावणार

कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वे सेवेला पाच नवीन थांबे मंजूर करण्यात आले आहेत. माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड स्थानकांचा समावेश झाल्याने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर परिसर, मराठवाड्यातील प्रवाशांसह अक्कलकोट व गाणगापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

Swapnil S

कराड : कोल्हापूर-मिरज-गुलबर्गा विशेष रेल्वे सेवेला पाच नवीन थांबे मंजूर करण्यात आले आहेत. माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड स्थानकांचा समावेश झाल्याने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर परिसर, मराठवाड्यातील प्रवाशांसह अक्कलकोट व गाणगापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. प्रवाशांची वाढती मागणीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. विशेष रेल्वे १४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे.

विशेष रेल्वेला माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. गाडी सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार या दिवशी धावेल. मंगळवार आणि शुक्रवारी रेल्वे सेवा बंद राहणार आहे. गाडी क्रमांक ०१४५१ कोल्हापूर-गुलबर्गा विशेष रेल्वे छत्रपती शाहू टर्मिनस, कोल्हापूर येथून सकाळी ६.१० मिनिटांनी सुटून दुपारी ४.१० मिनिटांनी गुलबर्गा येथे पोहोचेल. गाडी मिरज येथे सकाळी ७.३० वाजता, सांगोला येथे १०.५० वाजता, पंढरपूर येथे दुपारी १२.१५ वाजता, कुर्डूवाडी येथे १.१० वाजता, माढा येथे १.४३ वाजता, मोहोळ येथे २.०५ वाजता आणि सोलापूर येथे २.३० वाजता थांबेल.

परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०१४५२ गुलबर्गा-कोल्हापूर विशेष रेल्वे गुलबर्गा येथून सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी ती कोल्हापूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाणगापूर रोड येथे सायंकाळी ६.२९ वाजता, दुधनी येथे ६.४९ वाजता, अक्कलकोट रोड येथे रात्री ७.०४ वाजता, सोलापूर येथे ८.२५ वाजता, मोहोळ येथे ८.५९ वाजता, माढा येथे ९.१९ वाजता, कुर्डूवाडी येथे ९.४५ वाजता आणि पंढरपूर येथे रात्री ११.२० वाजता ही गाडी थांबेल. मिरज येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता थांबा असेल. याशिवाय हातकणंगले, जयसिंगपूर, आरग, बेळंकी, सलगरे, कवठे महांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, म्हसोबा डोंगरगाव, जवळे, वासूड आणि मोडलिंब या स्थानकांवरही गाडीचे नियमित थांबे कायम राहणार आहेत.

१८ डब्यांची रेल्वे

प्रवाशांच्या सुविधेसाठी या विशेष रेल्वेला एकूण १८ आयसीएफ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये चार एसी थ्री-टियर, सहा स्लीपर क्लास, सहा जनरल अनारक्षित आणि दोन दिव्यांग व गार्ड डब्यांचा समावेश आहे.पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर आणि मराठवाड्यातील प्रवाशांसह भाविकांनी या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या मिरज जंक्शन येथील प्रवासी वाहतूक नियमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती

दुष्काळाचे संकट गडद; आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित, राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार