महाराष्ट्र

सीईटीत कोल्हापूरची बाजी; ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्‍त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. या निकालात कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली असून पहिले दोन टॉपर या जिल्ह्यातील आहेत.

खुल्या प्रवर्गातून कोल्हापूरचा प्रतीक रामतीर्थकार प्रथम टॉपर ठरला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यातीलच सत्यजित जगताप याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सन्मय शाह तिसरा टॉपर ठरला आहे. हे तिन्ही विद्यार्थी पीसीबी गटाचे आहेत, तर ओबीसी प्रवर्गातून अहमदनगर जिल्ह्यातील श्रावणी छोटे टॉपर झाली आहे. तसेच एसी प्रवर्गातून मुंबई उपनगरातील प्रकाश क्षेत्री टॉपर ठरला आहे. एसटी प्रवर्गातून अकोला जिल्ह्यातील श्रुजन आत्राम टॉपर ठरला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल या कालीवधीत, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम गटाची परीक्षा दिली होती, तर पीसीबी गटाची परीक्षा ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी दिली होती.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन