'एआय'ने बनविलेले प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या कार सेवेचे भाडे ७,८७५ रुपयेच १२ तासात पोहचवणार

गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांसह कार वाहून नेण्याची सेवा सुरू केली आहे. या सेवेचे भाडे प्रति कार ७८७५ रुपये आहे. मुंबई ते गोवा दरम्यान ही सेवा असेल.

कमल मिश्रा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रवाशांसह कार वाहून नेण्याची सेवा सुरू केली आहे. या सेवेचे भाडे प्रति कार ७८७५ रुपये आहे. मुंबई ते गोवा दरम्यान ही सेवा असेल. या सेवेमुळे वाहतुकीचा वेळ वाचणार आहे. येत्या २३ ऑगस्टपासून ही सेवा सुरू होईल.

महाराष्ट्रातील कोलाड येथे या कार रेल्वेत टाकल्या जातील. त्यानंतर गोव्यातील वेर्णा येथे त्या उतरवल्या जातील. या रस्ते प्रवासाला २० ते २२ तास लागतात. हा प्रवास रेल्वेमार्गे १२ तासात पूर्ण होणार आहे.

प्रत्येक रेल्वेतून ४० कार नेल्या जातील. यासाठी प्रति कार ७८७५ रुपये भाडे असेल. या कार बेल्टने बांधल्या जातील. तसेच हँडब्रेक सक्तीचा असेल. या प्रवासाच्या काळात कारमध्ये एकही प्रवासी नसेल.

कारसोबत प्रवाशांसाठी खास जोडलेल्या एसी कोचमध्ये बसवले जाणार आहे. प्रत्येक कारमध्ये जास्तीत जास्त तीन प्रवाशांना नेता येऊ शकेल. एसीचे भाडे ९३५ रुपये तर जनरल डब्याचे भाडे १९० रुपये असेल. ही कारवाहू गाडी कोलाडहून सायंकाळी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी वेर्णा येथे पोहचेल.

तीन तास आधी कोलाडला पोहचणे गरजेचे

प्रवाशांना रेल्वेतून गाडी घेऊन जाण्यासाठी किमान तीन तास आधी कोलाडला पोहचावे लागेल. या ट्रेनमध्ये सलग २० विशेष डबे असतील. प्रत्येक डब्यात दोन कार असतील. किमान १६ कार बुक झाल्या तरच ही वाहतूक केली जाईल. प्रवास वेगवान व सुरक्षित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गणपतीच्या काळात रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ही सेवा प्रवाशांसाठी सुरू केली आहे.

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

१२ निरपराधांचा सगळा उमेदीचा काळ जेलमध्ये गेला, महाराष्ट्र ATS च्या 'त्या' अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? - ओवैसी

2006 Mumbai Local Train Blasts: मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, HC चा निकाल

“महाराष्ट्रात वाईट अनुभव'' ED च्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; सरन्यायाधीश म्हणाले, ''तोंड उघडायला लावू नका''

राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ; सहा महिन्यांत ४८७ तक्रारी, केवळ ४५ प्रकरणांचा निकाल