कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; नियमित, विशेष गाड्यांची कोंडी  (Photo-@indiarailinfo)
महाराष्ट्र

कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; नियमित, विशेष गाड्यांची कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे.

Swapnil S

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले आहे. एकेरी मार्गावर नियमित आणि विशेष गाड्यांची वाढलेली वर्दळ, तसेच गाड्यांच्या वेळापत्रकातील बदलांमुळे मुंबई, गोवा आणि कर्नाटकदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस, जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांनाही विलंबाचा फटका बसत आहे.

गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री १२.४५ वाजता सुटणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी सकाळी ८ वाजता रवाना झाली. गाडी क्रमांक १२०५१ जनशताब्दी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा अवघ्या एका मिनिटाने उशिरा सुटली; मात्र मडगाव येथे पोहोचताना तिला एक तास १० मिनिटांचा विलंब झाला.

गाडी क्रमांक २०११२ कोकणकन्या एक्स्प्रेस रविवारी रात्री ११.०२ वाजता सुटणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ही गाडी रात्री १२.३१ वाजता रवाना झाली. मडगावला ती चार तास ३४ मिनिटांचा विलंब झाला, तर गाडी क्रमांक १२१३३ मुंबई-मंगळुरू अतिजलद एक्स्प्रेस नियोजित वेळेत सुटली; मात्र मंगळुरू येथे दोन तास २६ मिनिटे उशिराने पोहोचली. कोकणकन्या एक्स्प्रेसचा अतिजलद दर्जा काढून तिला पुन्हा मेल-एक्स्प्रेस श्रेणीत आणावे.

वेळापत्रकाचे नियोजन शक्य होईल

सर्व गाड्या थेट मडगावपर्यंत चालविल्याने कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर ताण येत असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. काही गाड्या सावंतवाडी किंवा करमळीपर्यंतच मर्यादित ठेवल्यास कोकणातील प्रवाशांना अधिक गाड्या उपलब्ध होतील आणि वेळापत्रकाचे नियोजन करणे शक्य होईल, अशी सूचना करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब