महाराष्ट्र

कृष्णा साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी

येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्यावतीने हा पुरस्कार येत्या सप्टेंबरमध्ये पुणे येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.

कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच नवनवीन प्रयोग करत, शेतकरी सभासदांचे हीत साधले आहे.कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याने राबविलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेसह विविध ऊसविकास योजनांचे यांचे सखोल व गुणात्मक परीक्षण करून,या राष्ट्रीय पुरस्कारासाठी कृष्णा कारखान्याची निवड, भारतातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे एकमेव संयुक्त व्यासपीठ असलेल्या भारतीय शुगर या संस्थेने केली आहे. कृष्णा कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत गेल्या ६ वर्षात ११,९९९ शेतकरी सभासदांनी सहभाग घेऊन, हेक्टरी उत्पादकता सरासरी २० ते २५ मेट्रिक टनाने वाढविली आहे.कारखान्यामार्फत व्ही.एस.आय.पुणे येथे ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी ३०६ पुरुष सभासद व ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी ४७ सभासद महिलांना कारखान्याने संधी दिली आहे. कारखान्याने कृष्णा जिवाणू खत प्रकल्पातून आज अखेर १ लाख ६३ हजार ७१८ लिटर जिवाणू खतांचे उत्पादन केले आहे. खोडकिडीचे नियंत्रण करणाऱ्या ट्रायकोकार्डची निर्मिती करणारा कृष्णा कारखाना महाराष्ट्रातील एकमेव व पहिला साखर कारखाना आहे. कारखान्याने गांडूळ खत प्रकल्पात ६ वर्षांत ८९७ मेट्रीक टन गांडूळ खताचे उत्पादन केले आहे.

पुरस्कारांची हॅट्रीक

कृष्णा कारखान्याने २०१९-२० व २०२०-२१ या सलग दोन गळीत हंगामासाठी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचे पुरस्कार पटकाविले आहेत. त्यानंतर यंदा कारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकासासाठी भारतीय शुगरकडून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने कृष्णा कारखान्याने सलग ३ वर्षे पुरस्कार मिळवित हॅट्रीक साधली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस