कुडाळमध्ये भरदिवसा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; संशयिताला पकडले; महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कुडाळमध्ये भरदिवसा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला; संशयिताला पकडले; महिला कर्मचाऱ्याला चाकूचा धाक

कुडाळ शहरातील पानबाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी दुपारी भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. महिला कॅशियरला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तराज वासुदेव सडवेलकरला बँक कर्मचारी आणि नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Swapnil S

कुडाळ : कुडाळ शहरातील पानबाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी दुपारी भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. महिला कॅशियरला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तराज वासुदेव सडवेलकर ( २८) याला बँक कर्मचारी आणि नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क लावून बँकेत शिरलेल्या संशयिताने महिला कॅशियरला चाकूचा धाक दाखवत रोकड ताब्यात घेतली. मात्र, तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कर्मचारी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले.

या झटापटीत एका नागरिकाला चाकू लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयिताकडून चोरलेली रोकड जप्त करण्यात आली असून, प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम ३३ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. जखमी संशयिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दरोड्याच्या प्रयत्नात अन्य कोणी सहभागी होते का, बँकेची पूर्वनियोजित रेकी करण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, बँकेत सध्या सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai: २० ‌विभागांचा निधी दिवाबत्तीसाठी; रस्त्यांवरील दिवाबत्तीची ५४.८० कोटींची थकबाकी, चालू आर्थिक वर्षातील तरतूदही अपुरी

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती