photo : x (@RaviDadaChavan)
महाराष्ट्र

काँग्रेस नेते कुणाल पाटील भाजपमध्ये; उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का

काँग्रेसच्या कट्टर निष्ठावंतांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेते आणि माजी मंत्री दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. धुळे येथील रहिवासी असलेले पाटील यांनी त्यांचा निर्णय स्वेच्छेने आणि जनतेच्या पाठिंब्याने घेतला असल्याचे प्रतिपादन केले.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसच्या कट्टर निष्ठावंतांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेते आणि माजी मंत्री दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. धुळे येथील रहिवासी असलेले पाटील यांनी त्यांचा निर्णय स्वेच्छेने आणि जनतेच्या पाठिंब्याने घेतला असल्याचे प्रतिपादन केले.

भाजपमध्ये सामील होण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी जनसेवेच्या परंपरेतून आलो आहे. माझ्या समर्थकांनी आणि मतदारांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. मी अधिक प्रभावीपणे लोकांची सेवा करण्यासाठी भाजपमध्ये सामील होत आहे, असे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांनी पक्षात स्वागत केल्यानंतर सांगितले.

पाटील यांचा नोव्हेंबर २०२४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी यापूर्वी दोन वेळा आमदार म्हणून काम केले होते. त्यांच्या कुटुंबाचा तीन पिढ्यांपेक्षा जास्त काळ पक्षाशी संबंध असल्याने त्यांचे पक्षांतराला काँग्रेसचे मोठे नुकसान मानले जाते. ते दिवंगत रोहिदास पाटील यांचे पुत्र आहेत. ते काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री होते.

पक्षातील कुटुंबाचे महत्त्व लक्षात घेता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये रोहिदास पाटील आजारी असताना त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्यांच्याशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात फोनवरून संभाषणही घडवले होते.

कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामण पाटील हे १९६२ ते १९७१ दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार होते. पुण्याचे माजी आमदार संग्राम थोपटे एप्रिलमध्ये भाजपमध्ये गेले होते. त्यांच्यानंतर पाटील यांनीही पक्ष सोडला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पाटील यांचा निर्णय स्वतःलाच हानी पोहोचवणारा आहे. भाजप स्वतःच्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणू शकत नाही म्हणूनच ते इतर पक्षांमधील नेत्यांना चोरत आहे. कुणाल पाटील काँग्रेसच्या अभिमानी वारशातून आले आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही प्रमुख काँग्रेस नेते होते ज्यांनी महत्त्वाची पदे भूषवली होती. या निर्णयामुळे त्यांना खूप वाईट वाटेल, असे ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री