सुधीर मुनगंटीवार  
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना करावी लागणार प्रतीक्षा; २,१०० रुपये मिळणार पुढील भाऊबीजेला? सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने खळबळ

महायुतीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देणार, असे आश्वासन महायुतीतील नेत्यांनी प्रचारात दिले होते. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असले तरी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना २,१०० रुपयांसाठी पुढील भाऊबीजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : महायुतीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देणार, असे आश्वासन महायुतीतील नेत्यांनी प्रचारात दिले होते. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असले तरी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना २,१०० रुपयांसाठी पुढील भाऊबीजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना २,१०० रुपये देण्याआधी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात २,१०० रुपये जमा करण्यासाठी आणखी १० महिन्यांचा कालावधी लागेल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका मुलाखतीत सांगितले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत २०२४ च्या अर्थसंकल्पात १,५०० रुपयांप्रमाणे ४५ हजार कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार जुलै २०२४ पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबरपर्यंत अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत २,१०० रुपये देण्यात येतील, असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले होते.‌ मात्र, आता राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतरही २,१०० रुपये कधी मिळणार, याची प्रतीक्षा अडीच कोटी लाडक्या बहिणींना करावी लागत आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री