PM
PM
महाराष्ट्र

रायगडमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त ;तिघांना अटक

Swapnil S

रायगड : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. माणगाव पोलिसांनी स्फोटकांची अवैधपणे वाहतूक करणारी बोलेरो गाडी अडवल्यानंतर या वाहनातून तब्बल १२ लाख रुपयांच्या स्फोटकांची वाहतूक केली जात होती. या गाडीमध्ये डिटोनेटरसह जिलेटिन कांड्या सापडल्या आहेत. रायगड पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

यापूर्वी १९९३ साली झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी शेखाडी येथे स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्यावेळच्या काळ्या आठवणी पुन्हा जागा झाल्या. अवैध स्फोटक पदार्थांची वाहतूक एका बोलेरोमधून केली जात असल्याची गोपनीय माहिती माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेद्र पाटील यांना सूत्रांकडून मिळाली होती. पोलीस पथकाला माणगाव-निजामपूर मार्गावर पांढऱ्या रंगाची बोलेरो संशयितपणे दिसून आली. यानंतर पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी बोलेरो थांबून झडती घेतली असता, गाडीमध्ये ४ बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि तसेच जिलेटीन काड्यांचे ५० बॉक्स मिळून आले. याबाबत विचारणा केली असता आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

याआधी येताना पाली आणि पेण येथे देखील स्फोटके दिली असल्याची माहिती पकडलेल्या आरोपींनी दिली. या माहितीच्या आधारे माणगाव पोलिसांनी पाली आणि पेण येथून आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकुण १५०० किलो वजनाचे जिलेटीन आणि डेटोनिटर बॉक्स अशी स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. माणगाव पोलिसांनी हि धडाकेबाज कारवाई केली असून आरोपी विक्रम गोपाळदास जाट, विठ्ठल तुकाराम राठोड ,राजेश सुभेसिंग यादव यांच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांचा सूत्रधार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असून यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल