लासलगावात कांद्याचे दर घसरले; कर्नाटक-आंध्रचा नवीन कांदा आवक प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

लासलगावात कांद्याचे दर घसरले; कर्नाटक-आंध्रचा नवीन कांदा आवक

नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यामधील चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक दर गेल्या महिन्यातील किलोला ५५ रुपये वरून ४६ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Swapnil S

लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यामधील चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक दर गेल्या महिन्यातील किलोला ५५ रुपये वरून ४६ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

गेल्या तीन दिवसात कमाल दरात ५८९ रुपये घाऊक बाजारातील दर घसरले असतानाही शहरी किरकोळ बाजारात ग्राहकांना ६५ रुपये किलो मोजावे लागत आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवक वाढत असल्यामुळे राज्यातील कांदा बाजारावर दबाव निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील खरीप कांद्याची काढणी ऑगस्ट अखेरपासून सुरू झाली आहे. आता तेथील बाजारपेठांमध्ये आवक वाढत आहे. नवीन व ताजा कांदा उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी तसेच निर्यातदारांकडून या कांद्याला पसंती मिळत आहे. परिणामी, नाशिकच्या कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला असून, घाऊक दरात घसरण होत आहे.

कर्नाटकातील बाजारपेठेत कांद्याला ३५ ते ५१ रुपये किलो दर मिळत असल्यामुळे नाशिकच्या कांद्याच्या दरावरही त्याचा परिणाम होत आहे.

दिवाळीपर्यंत चढउतार

खरीप कांद्याची आवक विविध राज्यांत वाढती असली, तरी उत्पादनावर हवामानाचा परिणाम झाला आहे. आगामी काळात आवक, निर्यात आणि देशांतर्गत मागणी यावर कांद्याच्या दराचे गणित अवलंबून राहणार आहे दिवाळीपर्यंत बाजारात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

कायदा, पोलिसांची भीती गरजेची : सर्वोच्च न्यायालय

फॉर्म ६ फेरफारांची चौकशी; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, निवडणूक आयोगाला नोटीस; एकमताने किंवा बहुमताने न घेतलेले निर्णय रद्द करणार

Mumbai : ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे तरुणाचा मृत्यू; चार मित्रांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय