संग्रहित फोटो
महाराष्ट्र

शरद पवारांना सोडणे ही माझी चूक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नकळत कबुली

Swapnil S

गडचिरोली : राजकारणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यामुळे फूट पडली. आता हीच चूक अजित पवार यांना उमगल्याचे दिसत आहे. शरद पवारांना सोडणे ही चूक होती, असे नाव न घेताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली आहे.

राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला देताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांना सोडण्याची चुकी आपल्याकडून झाल्याची कबुली दिली.

अजित पवार हे गडचिरोली आणि चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली. पवार यांना सोडून आपल्याकडून चूक झाल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी शरद पवार यांचे नाव घेतले नाही. दरम्यान, धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे अजित पवारांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. घरात फूट पाडू नका, त्या अनुभवातून मी गेलोय. मी केलेली चूक तुम्ही करू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना दिला.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला