संग्रहित फोटो
महाराष्ट्र

बारामतीमध्ये सुनेत्राला उभे करून चूक केली! अजित पवार यांची कबुली

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात झालेली बारामती लोकसभा निवडणूक अख्ख्या देशात गाजली. या निवडणुकीतील पराभवाची सल अद्याप अजितदादांच्या मनात कायम राहिली असून, ‘सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते’, अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Swapnil S

अमळनेर : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात झालेली बारामती लोकसभा निवडणूक अख्ख्या देशात गाजली. या निवडणुकीतील पराभवाची सल अद्याप अजितदादांच्या मनात कायम राहिली असून, ‘सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते’, अशी कबुली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी सुप्रिया सुळेंकडे जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “सध्या माझा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन, तर राखी बांधून घ्यायला बहि‍णींकडे नक्की जाईन. राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचे नसते. पण त्या बाबतीत माझ्याकडून काहीशी चूक झाली. पक्षाच्या संसदीय मंडळाने तो निर्णय घेतला होता. त्यामुळे एकदा बाण सुटला की आपण काहीच करू शकत नाही. तसे व्हायला नको होते, हे माझे मन आज मला सांगत आहे.”

विशेष म्हणजे, बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांनी १ लाख ५८ हजार एवढ्या मताधिक्याने सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.

रामकृष्ण हरी - सुप्रिया सुळे

अजित पवार यांचे हे वक्तव्य मला माहीत नाही. मात्र ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांना हळूहळू आपल्या सर्वच चुका लक्षात येतील, असा टोला काँग्रेसच्या एका नेत्याने अजित पवार यांना लगावला.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी