महाबळेश्वरमधील तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

महाबळेश्वरमधील तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महाबळेश्वरमधील तीन प्रसिद्ध हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. अचानक केलेल्या तपासणीत या हॉटेलांमध्ये स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय अन्य पाच हॉटेलांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Swapnil S

महाबळेश्वर: दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महाबळेश्वरमधील तीन प्रसिद्ध हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. अचानक केलेल्या तपासणीत या हॉटेलांमध्ये स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय अन्य पाच हॉटेलांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हॉटेल एव्हरशाइन, क्षेत्र महाबळेश्वर येथील हॉटेल रामसुख आणि नाकिंदा येथील हॉटेल ब्राइटलँडमध्ये स्वच्छतेसंदर्भातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे एफडीएने या तिन्ही हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने काही दिवसांसाठी निलंबित केले आहेत. या हॉटेलच्या रेस्टॉरंटमधील खाद्य सेवा तात्पुरती बंद केली आहे.

एफडीएचे सहआयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अचानक तपासणी मोहीम राबवली. महाबळेश्वरमधील अनेक हॉटेलांच्या स्वयंपाकघरांची तसेच रेस्टॉरंटमधील सुविधांची तपासणी करण्यात आली. यात अन्य पाच आस्थापनांमध्येही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावून संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा फटका पर्यटकांना बसला आहे. त्यांना ऐनवेळी दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागत आहे तर काहींना आपले प्रवासाचा बेतच रद्द केल्याचे दिसत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश

आरोग्य क्षेत्र आयसीयूत; केंद्राच्या अहवालातून महाराष्ट्राचे जळजळीत वास्तव उघड

आदिवासींचा मताधिकारही नाकारला; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

देशाची बदनामी केलीत तर ३० वर्षे सत्ता मिळणार नाही; अमित शहा यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

Mumbai : सीएसएमटी स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी