Mahalaxmi Express Robbery : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; महिलांचे ५२ हजारांचे दागिने चोरले 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Satara : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; महिलांचे ५२ हजारांचे दागिने चोरले

Mahalaxmi Express Robbery : रेल्वेची सिग्नल यंत्रणा निकामी करून धावती महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबविण्याचा आणि त्यानंतर प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ घडला.

Swapnil S

पुणे : रेल्वेची सिग्नल यंत्रणा निकामी करून धावती महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबविण्याचा आणि त्यानंतर प्रवाशांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ घडला. सिग्नल यंत्रणेच्या तारा कापल्यामुळे गाडी सुमारे १५ मिनिटे थांबली. याचा फायदा घेत चोरट्यांनी डब्यांच्या खिडक्यांमधून हात घालून दोन महिला प्रवाशांचे ५२ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले. या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास लोणंद आणि सालपे स्थानकांदरम्यान असताना सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेच्या तारा कापल्याने गाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे गाडी थांबली. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी झोपलेल्या प्रवाशांना लक्ष्य केले. डब्यांच्या खिडक्यांमधून हात घालून महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून ते पसार झाले. महिलांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला.

रेल्वेवर केली तुफान दगडफेक

या धाडसी दरोड्यादरम्यान चोरट्यांनी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रेल्वेवर तुफान दगडफेक केली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. या घटनेत मुंबईतील सुनीता तुपे यांचे ४५ हजार ६०० रुपये किमतीचे मंगळसूत्र, तर खोपोली येथील सुरेखा खाडे यांचे सात हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले. दोन्ही महिला कौटुंबिक कार्यक्रमासाठी कोल्हापूरला जात होत्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

...तर विमान प्रवास करू नका; ७०० टक्के दरवाढ याचिकेवर सुप्रीम कोर्टाची धक्कादायक सूचना

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

न्यायालये बॉम्बने उडवण्याची धमकी; ठाणे, सांगली, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर न्यायालयात आले ई-मेल

राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? नाराज नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट; पवार माय-लेक वगळून NCP च्या विलीनीकरणाची चाचपणी

‘दिया’च्या आवाहनावरून गदारोळ; फटाके न फोडण्याच्या मिर्झाच्या वक्तव्याने राजकीय वातावरण पेटले, भाजपच्या आक्षेपानंतर व्हिडीओ गायब