महाराष्ट्र

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

येत्या एक-दोन दिवसांत प्रशासनातील खांदेपालटवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून...

Krantee V. Kale

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून गृहनिर्माण, जलसंपदा विभागाला लवकरच नवे सचिव मिळणार आहेत, तर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव  ओ. पी. गुप्ता यांच्या जागी विकासचंद्र रस्तोगी यांची वर्णी लावली जाणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत प्रशासनातील खांदेपालटवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सोमवारी दिली.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सीमा व्यास या वयोमानानुसार येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया सुरू आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्र्यांनी  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या  पाठोपाठ आता मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

विकासचंद्र रस्तोगी यांची अलीकडेच कृषी विभागातून वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) बदली करण्यात आली. ओ. पी. गुप्ता हे याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी गुप्ता यांना हलवून त्यांच्या जागी रस्तोगी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावरून वल्सा नायर-सिंह  या गेल्या वर्षी मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्तीपासून गृहनिर्माण खात्याला पूर्णवेळ सचिव मिळालेला नाही. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याकडे आहे. त्यामुळे गृहनिर्माण विभागाला पूर्णवेळ सचिव  जाणार आहे.  महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून झाली आहे. त्यामुळे महावितरणमध्ये नव्या व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती अपेक्षित आहे.

बदल्यांचा धडाका

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यापासून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधीपासून? सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली महत्त्वाची माहिती

­सरकारची रिक्षा-टॅक्सीचालकांना मुदत देण्याची तयारी; परिवहन अधिकाऱ्यांसोबत आज बैठक - सरनाईक

Mumbai : राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या चार हजार एकर जमिनीवर अतिक्रमण

संमतीने संबंध असतील तर गुन्हा कसा ठरतो? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

शाळा सुटली...कडक उन्हाळ्यामुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर