विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा; पंढरपूरमधील भाविकांच्या सुविधेसाठी निर्णय (Photo- @vitthalrukminimandir)
महाराष्ट्र

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा; पंढरपूरमधील भाविकांच्या सुविधेसाठी निर्णय

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य सरकारने यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली.

Swapnil S

मुंबई : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य सरकारने यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली.

मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती. भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ याठिकाणी उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी (गोमाता संवर्धन आणि भाविकांची सुविधा) या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील. ज्या कामासाठी जमीन दिली आहे, केवळ त्याच कामासाठी तिचा वापर करता येईल. इतर कोणत्याही तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग