महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

महाराष्ट्रासह ५ राज्यांना दुष्काळाचा विळखा; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती

यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदाच्या खरीप हंगामात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील काही भाग, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : यंदा पावसाने ओढ दिल्याने यंदाच्या खरीप हंगामात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील काही भाग, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी दिली.

चौहान म्हणाले, ‘आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि लगतचे भाग, तेलंगणातील काही भाग तसेच राजस्थानातील काही भागांमध्ये दुष्काळाची चिंता आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, ते स्वतः दुष्काळग्रस्त राज्यांचा दौरा करणार असून, संबंधित राज्य सरकारांच्या सतत संपर्कात राहणार आहेत. ‘शेतजमीन पडीक राहू नये, हे आमचे तातडीचे उद्दिष्ट आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

रब्बी हंगामासाठी मदत करणार

आगामी रब्बी हंगामासाठी केंद्र सरकार राज्यांना कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत तयार होणारी तसेच स्थानिक माती आणि हवामानाला अनुकूल असलेली बियाणे व पिकांच्या वाणांची निवड करण्यास मदत करणार आहे. शेती सुरू ठेवण्यासाठी केंद्राकडून सहकार्य केले जाईल. तसेच राज्ये आणि इतर संबंधित घटकांमध्ये समन्वय व सहकार्य वाढविण्यासाठी केंद्र पुढाकार घेईल, असेही चौहान यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात दुष्काळामुळे भाजीपाल्याचे दर दुप्पट; पितृपक्षामुळे भाज्यांची मागणी वाढली

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका