चंद्रशेखर बावनकुळे याचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

Maharashtra assembly election 2024: राज्यात महायुतीला जनतेने दणदणीत कौल दिला आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. २६ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीतील हालचालींना वेग आला असला तरी मुख्यमंत्री कोण? यावर अद्याप मौन कायम आहे. महायुतीतील तीन प्रमुख नेते आणि केंद्रीय संसदीय बोर्डात यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

Swapnil S

मुंबई : राज्यात महायुतीला जनतेने दणदणीत कौल दिला आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. २६ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीतील हालचालींना वेग आला असला तरी मुख्यमंत्री कोण? यावर अद्याप मौन कायम आहे. महायुतीतील तीन प्रमुख नेते आणि केंद्रीय संसदीय बोर्डात यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे सोमवारपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्ट होईल, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना फसवी, संविधानाला धोका, धार्मिक आवाहन करणे चुकीचे आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत खोटारडेपणा केला तोच त्यांना नडला, अशा शब्दांत बावनकुळे यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर आता भाजपच्या बळकटीकरणासाठी राज्यात ‘सदस्य अभियान संकल्प’ अभियानांतर्गत १ कोटी ५१ नवमतदारांनी सदस्य अभियान संकल्पात निवडणुकीच्या काळात मविआ आमिष दाखवत आहे, असे जनतेला वाटले. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दणदणीत बहुमत दिले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना या निवडणुकीत धूळ चारली. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे नाना पटोले हे पोस्टल बॅलेट पेपरवर फक्त २०८ मतांनी निवडून आले. मविआने महायुतीविरोधात षडयंत्र रचले आणि त्यात तेच अडकले. ज्या दिवशी मविआने उमेदवार उभे केले त्याच दिवशी ते पडले, असा खोचक टीका बावनकुळे यांनी केली.

त्यांच्या कर्माची फळे भोगताहेत

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विशेष करून काँग्रेसच्या नेत्यांनी महायुतीविरोधात खोटी माहिती पसरवली. लोकसभा निवडणुकीत जी खोटी माहिती जनतेपर्यंत पसरवली, त्याचा भाजपला फार काही फरक पडला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला विशेष करून काँग्रेसला नाकारले. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष नसणे म्हणजे ही काँग्रेसच्या कर्माची फळे ते भोगत आहेत, अशी सडकून टीका बावनकुळे यांनी केली.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी