(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

राहुल गांधी यांची चिमूरमध्ये उद्या सभा

Maharashtra assembly elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची १६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिभूमी चिमूर येथे, तर प्रियंका गांधी यांची गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील वडसा येथे १७ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची १६ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिभूमी चिमूर येथे, तर प्रियंका गांधी यांची गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील वडसा येथे १७ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे.

या सभेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडी व त्यांच्या घटक पक्षांचे नेते, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील उमेदवार, पदाधिकारी प्रामुख्याने या सभेला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला मोजकेच दिवस शिल्लक असून निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत. हे नेते आपल्या सभांमधून विरोधकांवर टिकेची तोफ डागत आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी