महाराष्ट्र

आज प्रचाराच्या तोफा थंडावणार; अखेरच्या रविवारी उमेदवारांनी गाळला घाम, दिग्गज नेत्यांचा प्रचाराचा धडाका

Maharashtra assembly elections 2024 : गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी, २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी प्रचार, जाहीर सभा, रॅली काढत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा रविवार अखेरचा असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी चांगलाच घाम गाळला.

Swapnil S

मुंबई : गेला महिनाभर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी, २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी प्रचार, जाहीर सभा, रॅली काढत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा रविवार अखेरचा असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी चांगलाच घाम गाळला. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, शिवराज सिंह चौहान, अजित पवार, प्रियांका गांधी, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांनी ठिकठिकाणी जाहीरसभा घेत प्रचाराचा कळस गाठला.

प्रचारासाठी आज अखेरचा रविवार असल्याने सकाळीच प्रचाररथ सजले होते. प्रचाररथावर डिजिटल स्क्रीनवर नेत्यांची रेकॉर्डेड भाषणे सुरू होती. पूर्ण दिवस उमेदवारांनी प्रचार करून रविवारचा दिवस सार्थकी लावला. मुख्य पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार प्रचारात आघाडीवर होते. काही उमेदवारांनी विभागवार जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रविवार सुट्टी असल्याने बहुतांश लोक घरीच होते. त्यामुळे उमेदवारांनी ही संधी साधत घरोघरी भेटीगाठी घेत प्रचाराचा धुरळा उडवला.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर सोमवारच्या संध्याकाळपासून मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवारांच्या हाती आहे. या काळात उमेदवारांकडून छुप्या प्रचारावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

२० नोव्हेंबरला मतदान

राज्यातील विधानसभा निवडणूक सर्वंच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आता बुधवारी, २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील ९ कोटी ७० लाख मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदारांचा कौल आपल्याला मिळावा यासाठी उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.

मणिपूरमध्ये आणखी चार आमदारांची घरे पेटविली; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न

मी थोड्याच दिवसांचा पाहुणा - मनोज जरांगे पाटील

वांद्रे - वरळी फक्त १० मिनिटांत; जानेवारी मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत कोस्टल रोडचे ९३ टक्के काम फत्ते

सोडून गेलेल्यांना जोरात पाडा! शरद पवारांचा एल्गार

पर्थमध्ये सलामीसाठी राहुल सज्ज? नेटमध्ये केला कसून सराव फिटनेसची चिंता जवळपास दूर