उद्धव ठाकरे,शंभूराज देसाई (डावीकडून) 
महाराष्ट्र

'जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री', उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

Maharashtra assembly elections 2024 : “शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे, असे तुम्हाला वाटते? म्हणजे शिवसेनेने मंत्री केले तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे, जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री, बस वाजंत्री वाजवत.

Swapnil S

कराड : “शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे, असे तुम्हाला वाटते? म्हणजे शिवसेनेने मंत्री केले तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे, जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री, बस वाजंत्री वाजवत. पाटणमध्ये एक गद्दार आहे, त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे मला माहिती आहे. फक्त सत्ता येऊ द्या, त्यानंतर यांची सगळी प्रकरणं मार्गी लावतो”, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांना दिला. तसेच हर्षद म्हणाला ‘साहेब मी एकटा लढतोय. अरे एकटा कुठे मी आहे ना तुझ्यासोबत, जनता आहे. तीन उमेदवारांमध्ये एक आहे लुटमार मंत्री’, असे ठाकरे यांनी म्हटले.

पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी ठाकरे म्हणाले, शिवसेनेने हे चाळे कधी केले नाहीत. राजकीय वैमनस्य असेल तर उघडपणे करायचे. आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. काही जाहीराती या गद्दारांनी दिल्या आहेत. नामर्दाची औलाद तुझ्यात हिंमत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागायला ये. मग कसे जोडे खातो ते बघ, ज्याप्रकारे मी बाकी उमेदवारांना देतो आहे, त्याचप्रमाणे मी या शिंदेला दिल होत खूप काही दिल होत. याला होम मिनिस्टर केला होता पण याने काय केले, पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि मिध्यांना पळून जायला मदत केली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

घरच्या लग्नासाठी राज्य उत्पादन शुल्क लुटले

ज्याने घरच्या लग्नासाठी एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क) लुटले. अधिकारी वापरले, पैसे वापरले, असे काही समजू नका. त्यांच्या दुर्देवाने मी सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. माझे सुद्धा प्रशासकीय विभागात काही संबंध आहेत. पैशांचा वापर कसा झाला, पैसे कुठे गेले? हे मला सांगत असतात, जरा थांबा. आमची सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणे मी कशी मार्गी लावतो ते बघा. लुटमार मंत्र्यांनी पैसे लुटलेत. जनतेला आणि महाराष्ट्राला लुटलंय. त्या लुटमारीचे पैसे वाटून पुढची तयारी करत आहेत", असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी