संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

Maharashtra Election : 'मविआ'च्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त; काँग्रेसला सर्वाधिक जागा?

महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर मविआची पहिली यादी जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर मविआची पहिली यादी जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. येत्या आठ दिवसांत आचारसंहिता लागू होईल असे संकेत आधीच मिळाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. महाविकास आघाडीच्याही गेल्या काही दिवसांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडल्या आहेत. यात जागावाटपाचा फॉर्म्युला आता अंतिम टप्प्यात असून जवळपास निश्चित झालेला आहे. यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील समाजवादी पक्ष आणि शेकाप सारख्या पक्षांना ३ ते ५ जागा देण्याची चर्चा मविआत झाली आहे. याबाबत बुधवारी मविआची बैठक पार पडली. त्यानंतर पुढच्या आठवड्यात ७, ८ व ९ ऑक्टोबर सलग तीन दिवस मविआच्या मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. या तीन बैठकांमध्ये जागावाटप अंतिम होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होईल, असे सांगण्यात आले.

काँग्रेसला सर्वाधिक जागा?

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेचे ९० ते १००, काँग्रेस १०० ते १३० जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ८० ते ८५ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले