संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

‘सिंह’ म्हातारा झालाय!

Maharashtra Assembly Elections Results 2024: शनिवारी सकाळी कल जाहीर होऊ लागले तसे लोकांची उत्सुकता ताणली गेली होती. दुपारी बारानंतर चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले तसे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल धक्कादायक ठरले. बहुतांश लोकांच्या पचनी हे निकाल पडत नसल्याचे दिसून आले. विशेषत: शरद पवार हे महाराष्ट्राचे चाणक्य आहेत.

अभय जोशी

शनिवारी सकाळी कल जाहीर होऊ लागले तसे लोकांची उत्सुकता ताणली गेली होती. दुपारी बारानंतर चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले तसे महाराष्ट्र विधानसभेचे निकाल धक्कादायक ठरले. बहुतांश लोकांच्या पचनी हे निकाल पडत नसल्याचे दिसून आले. विशेषत: शरद पवार हे महाराष्ट्राचे चाणक्य आहेत. गेल्या ५० वर्षांच्या राजकारणात त्यांनी भल्याभल्या राजकीय नेत्यांना आसमान दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दमदार कामगिरीने भाजपसह शिंदे आणि अजित पवार गटाला धक्का बसला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह अन्य विरोधकांना शरद पवार आता विधानसभेत आपला चमत्कार पुन्हा दाखवणार असे वाटत होते. शनिवारी पवारांच्या पक्षाच्या कामगिरीने या सर्वांनाच मोठा धक्का बसला.

किमान ६० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. काँग्रेस नेते आणि शिवसेना ठाकरे पक्ष किमान शंभर जागा लढवण्याचा आग्रह धरत असताना त्यांच्यापेक्षा कमी जागांवर शरद पवार यांनी समाधान मानले होते. या स्थितीत शरद पवार यांच्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ खूप मोठा असेल, अशी चर्चा निवडणुकीच्या आधी रंगली होती. त्यामुळे अवघे १४ उमेदवार विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांना आणि खुद्द पवारांनाही मोठा धक्का बसला असणार, यात नवल नाही. विशेषत: बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा ‘होमग्राऊंड’ होता. स्वत:च्या मतदारसंघात आपण कधी पराभूत होऊ, असा विचार सुद्धा त्यांनी कधी केला नसावा. कारण त्यांनी बारामती मतदारसंघाचा विकास ही त्यांची जमेची बाजू. त्यांनी कारखाने, शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या. लोकांना मतदारसंघातच रोजगार उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर चांगले रस्ते त्यांनी दिले, असे कायमच सांगितले जाते. बारामतीतील विकास राज्याच्या अन्य काही भागांपेक्षा नक्कीच उत्तम करताना अजित पवार हेच शरद पवारांचे वारसदार स्पष्ट झाले होते. काही वर्षांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश करत बारामतीतून खासदार झाल्यानंतर पवार कुटुंबात दुहीची सुरुवात झाली असावी. पुढे राज्यातील अन्य राजकीय कुटुंबातील पुतण्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत ‘घरफोडी’ झाली होती. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील भाजपाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर पहिले काम कित्येक वर्षे पवारांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या सहकारातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ केले. शरद पवार यांची प. महाराष्ट्र, मराठवाडा विभागातील पक्षसंघटना खिळखिळी केली. त्याचबरोबर अजित पवारांनाच भाजपच्या साथीने ‘बारामती’तच शरद पवारांची कोंडी केली. पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेला पराभूत झाल्यानंतरही विधानसभेला अजित पवार १ लाखांहून अधिक मतांनी विजयी होणे शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या व्यूहरचनेने महाराष्ट्राचे चाणक्य असलेल्या शरद पवार यांच्या राजकारणाची पुरती कोंडी झाली आहे, हे नक्की. सिंह म्हातारा झाला की त्याची हालत खराब होते, तसे पवारांचे वय पाहता त्यांना राजकीय कोंडी फोडणे आता कठीण दिसते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले

निकालात दडलंय काय? हिंदुत्वाचे वर्चस्व