महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीची मतमोजणी आज (शनिवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. राज्य विधानसभेच्या महासंग्रामात महायुती जिंकणार की महाआघाडी सत्तेचा सोपान गाठणार याविषयीची मतदारांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Swapnil S

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठीची मतमोजणी आज (शनिवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाली आहे. राज्य विधानसभेच्या महासंग्रामात महायुती जिंकणार की महाआघाडी सत्तेचा सोपान गाठणार याविषयीची मतदारांमधील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची महायुती, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट व शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. या निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ फलदायी ठरणार की, ‘सरकार पाडापाडी’ भोवणार? या प्रश्नांची उत्तरे निकालातून मिळणार आहेत. यंदाचे जास्तीचे मतदान कुणाच्या बाजूने झुकणार याचीही उत्सुकता वाढली आहे. ही निवडणूक म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यात शिवसेनेचे आदित्य ठाकरे, मनसेचे अमित ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युगेंद्र पवार यांचीही कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत मुंबई, ठाणे व कोकणवर वर्चस्व महाआघाडीचे राहणार की महायुतीचे याचाही निकाल लागणार आहे. तसेच, विदर्भ, मराठवाड्यात कुणाची सरशी होणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या मतमोजणीचे बघूया सर्व अपडेट्स

सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंतचे २८८ जागांवरील कल

महायुती - २३६

मविआ - ४९

अन्य - ३

पक्षनिहाय कल

भाजप - १३७

शिवसेना (शिंदे गट) -५८

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४१

काँग्रेस - २०

शिवसेना (उबाठा) - १५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - १४

(बातमी आणि आकडे अपडेट होत आहेत.)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती