@ANI
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनाआधी पायऱ्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक

एकीकडे राहुल शेवाळेंविरोधात विरोधकांनी (Maharashtra Winter Session) आंदोलन केले तर आदित्य ठाकरेंविरोधात सत्ताधारी नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले

प्रतिनिधी

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली. (Maharashtra Assembly Winter Session) याआधी सत्ताधारी आणि विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. सत्ताधारी पक्षांनी दाऊदशी संबंधित महिलेला पाठिशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हातात फलक घेऊन सत्ताधारी आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केले. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणादेखील दिल्या.

तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. कर्नाकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, 'खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके', 'निर्लज्ज सरकार, मिंधे सरकार', 'बोम्मईसमोर माना खाली घालणाऱ्या सरकार हाय हाय', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. दुसऱ्या आठवड्याची सुरुवात वादळी झाली असून आता या आठवड्यामध्ये दोघांची रणनीती काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली