महाराष्ट्र

Maharashtra Assembly Winter Session : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत केल्या या मागण्या; म्हणाले...

प्रतिनिधी

नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या आठवड्यात विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, असे सांगताच ते आक्रमक झाला आणि म्हणाले, "विधानसभेत आणि विधान परिषदेत सीमावादावत प्रस्ताव मांडायचे सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज होती का? दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री सिमाप्रश्न मांडणार का?" असा सवाल उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले," एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत, तर इकडे आपले मुख्यमतनरी एकनाथ शिंदे हे सीमावादावर एक शब्ददेखील काढत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला, तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच नव्हे तर, त्या ग्रामपंचायतीदेखील बरखास्त करण्यात आल्या. आपल्या देशात काय मोगलाई आहे का?" अशी टीका त्यांनी यावेळी केली. पुढे विधान परिषदेत त्यांनी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी गेले असताना मोरारजी देसाई यांच्या गाडीवर हल्ला केल्याची आठवणही सांगितली.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

World Laughter Day 2024: हसत राहा! हसल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण