ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीची माहिती देणे बंधनकारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे महाविद्यालयांना निर्देश 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

ट्युशन फी, डेव्हलपमेंट फीची माहिती देणे बंधनकारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे महाविद्यालयांना निर्देश

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

Swapnil S

मुंबई : उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काबाबत संपूर्ण आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. याबाबतचे निर्देश सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

बारावी निकालानंतर सर्व महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महाविद्यालयांनी विद्यापीठ किंवा शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या नियमानुसार व मान्यतेनुसार आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी व इतर शुल्काची अद्ययावत माहिती कॉलेजच्या सूचना फलकावर लावणे अनिवार्य आहे तसेच प्रवेश शुल्कासह संपूर्ण शुल्काची माहिती बंधनकारक आहे.

तक्रारी निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्या!

शुल्काबाबतची माहिती सूचना फलकावर आणि प्रवेश माहितीपुस्तिकेमध्ये दिसण्याबाबतची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ आणि संबंधित विभागीय सहसंचालक यांच्यावर राहणार आहे. सर्व विभागीय सहसंचालक आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांनी ही बाब आपल्या अधिनस्त आणि संलग्नित महाविद्यालयांना आपल्या स्तरावरून तत्काळ सूचित करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी तसेच कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा दगड कोसळला

Mumbai : पावसामुळे दाणादाण! सात दिवसांत ११ मृत्यू, २२ जखमी; एक हजाराहून अधिक झाडे कोसळली, १३०० हून अधिक फांद्या कोसळल्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस मुदतवाढ; १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Monsoon Session : पावसाळी चर्चा वादळी ठरणार; शुक्रवारी विशेष सभागृहाचे आयोजन