देवेंद्र फडणवीस संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा आणि वीज उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले.

Swapnil S

मुंबई : मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा आणि वीज उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे डेटा सेंटर्स संदर्भात बैठक झाली. या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती दिली. या बैठकीत सिडकोच्या वतीने डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली तर डेटा सेंटर क्षेत्रातील कंपन्यांसाठी पुरेशा विजेची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली. बैठकीला उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आदी उपस्थित होते.

जमीन, वीज उपलब्ध करून द्यावी !

या कंपन्यांच्या प्रकल्प उभारणीसाठी संदर्भातील सर्व अत्यावश्यक कामे तसेच प्रामुख्याने जमीन उपलब्ध करून देण्याची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. याशिवाय संबंधित कंपन्यांना विजेची उपलब्धताही प्राधान्याने करून द्यावी. संबंधित यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी. सिडकोने यासाठी भू बँक विकसित करावी. ऊर्जा विभागाने सब स्टेशनसाठी जागा त्वरित उपलब्ध करून घ्यावी, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी केल्या.

११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य