मतवारी दुष्काळाची! जग वाचवण्याचे उत्तर दोन ओळींत प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मतवारी दुष्काळाची! जग वाचवण्याचे उत्तर दोन ओळींत

दुष्काळ आणि पाणी यांचा प्रश्न मागच्या लेखात मांडला. पण हा दुष्काळ एकटा आलेला नाही. त्याच्या मागे तापमानवाढ उभी आहे. ही गोष्ट आता पक्की झाली आहे. तरीही तापमानवाढीचा धोका आपण गांभीर्याने घेतलेला नाही. यंदा हिवाळा जाणवला नाही आणि पावसाळाही नीट आला नाही. वर्षभर उन्हाळाच आहे की काय, असे वाटू लागले आहे.

प्रतिनिधी

पाशा पटेल

दुष्काळ आणि पाणी यांचा प्रश्न मागच्या लेखात मांडला. पण हा दुष्काळ एकटा आलेला नाही. त्याच्या मागे तापमानवाढ उभी आहे. ही गोष्ट आता पक्की झाली आहे. तरीही तापमानवाढीचा धोका आपण गांभीर्याने घेतलेला नाही. यंदा हिवाळा जाणवला नाही आणि पावसाळाही नीट आला नाही. वर्षभर उन्हाळाच आहे की काय, असे वाटू लागले आहे.

ज्या घरांत एसी फक्त मार्च ते मे महिन्यांत लागायचा, तिथे आता तो बारा महिने सुरू ठेवावा लागतो. ४०-५० दिवस उष्णतेच्या लाटा येणार असतील, तर हे संकट किती खोल आहे हे लक्षात येईल. गरमी वाढली की एसी, पंखे वाढतात. विजेचा वापर वाढतो आणि ती वीज बनवण्यासाठी जास्त कोळसा जाळला जातो. कोळसा जाळाला की, तापमान आणखी वाढते आणि पुन्हा विजेची मागणी वाढते. हे चक्र थांबत नाही.

लातूरला रेल्वेेने पाणी पोहोचवावे लागले

चेन्नईत रस्त्यांवरून होड्या चालवाव्या लागल्या. बंगळुरूही बुडाले आणि वाळवंटातली दुबईसुद्धा पाण्यात गेली. दुसरीकडे युरोप उष्णतेने भाजून निघाला. अमेरिकेत कॅलिफोर्नियातल्या वणव्यांत हजारो घरे जळून खाक झाली आणि लाखो एकर जंगल राख झाले. अवकाळी गारपीट आता नवलाईची राहिलेली नाही. याच महाराष्ट्रात लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवावे लागले होते.

...तर संकटे थांबतील

माझ्या दृष्टीने देव म्हणजेच निसर्ग. माणसाने ज्या चुका करून ठेवल्या आहेत, त्या दुरुस्त करायच्या तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. यासाठी शंभर गोष्टी करायची गरज नाही. जग वाचवण्याचे उत्तर दोन ओळींत आहे. पहिली ओळ म्हणजे फॉसिल फ्युएलऐवजी बायोफ्युएल वापरणे. दुसरी ओळ म्हणजे देशाच्या भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हिरवे करणे. या दोन ओळी आपण अमलात आणल्या, तर पर्यावरण सुधारेल आणि माणसासमोरची बहुतेक संकटे थांबतील. ही दुसरी ओळ थेट मागच्या लेखातल्या खड्ड्यांशी जोडलेली आहे.

विकासाच्या इतर कामांची घाई नको !

ज्या माळांवर आम्ही पाणी अडवले आणि झाडे लावली, तिथे परिणाम लगेच दिसू लागला. एकीकडे पाणी मुरते आणि दुसरीकडे झाड कार्बन शोषून घेते. दुष्काळ आणि तापमानवाढ या दोन्ही संकटांवर एकच काम चालते. म्हणून विकासाच्या इतर कामांची घाई काही काळ बाजूला ठेवावी. डोंगर, माळ आणि जिथे जागा दिसेल ती जमीन खणून पाणी साठवावे आणि झाडे लावायची तयारी आत्ताच करावी. दुसरा इलाज नाही. (क्रमश:)

निसर्गाने रौद्र रूप दाखवले

आता पुन्हा काही नव्या कोळसा प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. याचा अर्थ एवढाच की तापमानवाढ कमी करण्याचे बोलणे आणि प्रत्यक्ष निर्णय यांत अजून मोठे अंतर आहे. निसर्गाने रौद्र रूप दाखवून झाले अजून कोणत्या इशाऱ्याची वाट आपण पाहत आहोत? यंदा जून-जुलैमध्ये पालघर जिल्ह्यातल्या काही गावांतून दहा-दहा फूट पाणी वाहिले. नांदेड जिल्ह्यात गावे पाण्याखाली गेली. मुंबई तुंबते, ते आपण दर वर्षी पाहतो.

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोग

Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग

FASTag New Rules : टोलनाक्यापासून २० किमी अंतरामध्ये राहता? १ नोव्हेंबरपासून १,५०० रुपयांत वर्षभराचा पास; जाणून घ्या नियम

Mumbai : जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ

मुंबई, ठाणे, भिवंडीकरांनो पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन

Mumbai : अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर बडगा! ११ नोव्हेंबरपर्यंत BMC ची विशेष मोहीम