निवडणुका वेळेत होणार; निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार - राज्य सरकारचा निर्णय  
महाराष्ट्र

निवडणुका वेळेत होणार; निवडणूक अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढणार - राज्य सरकारचा निर्णय

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्विकारणाऱ्या किंवा स्विकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले जात होते. मात्र यामुळे निवडणूक प्रक्रियेस विलंब होत असे. यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज स्विकारणाऱ्या किंवा स्विकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाला जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले जात होते. मात्र यामुळे निवडणूक प्रक्रियेस विलंब होत असे. यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम १४ मध्ये, पोट-कलम (२) अंतर्गत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होते. मात्र विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अशी अनेक अपीले प्रलंबित राहत असल्याने निवडणुका कालबद्धरित्या घेणे शक्य होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने शासनास या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनास अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील, तसेच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्रे) स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, अशी कलमे यात समाविष्ट करण्यात आली आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती