मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत नेते, राज्याचे उपमुख्यमंत्रीपद तसेच केंद्रीय मंत्रिपद भूषविलेले गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात भाजपला मराठा मतांच्या एकत्रीकरणाचा प्रभावीपणे सामना करावा लागणार आहे. तसेच पक्षाची पारंपरिक ओबीसीची मतेही यंदा दुरावण्याची चिन्हे आहेत.
तब्बल दशकभरानंतर राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार दिलेला नाही.
चार महिन्यांपूर्वी, परळी मतदारसंघाचा समावेश असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार व महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे यांची चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव होण्यासाठी मराठा घटक कारणीभूत ठरल्याची चर्चा अजूनही आहे.
सोयाबीन पिकांसाठी किमान आधारभूत किंमत आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांची चर्चा असलेल्या परळी या ग्रामीण मतदारसंघात मराठा कोटा हा एक महत्त्वाचा घटक आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारविरोधात मराठ्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी धनंजय मुंडे यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
अजित पवारांचे निष्ठावंत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने (शरद पवार गट) राजेसाहेब देशमुख यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे.
परळी हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे मूळ गाव आहे. मराठवाड्यात भाजप वाढण्याचे श्रेय यासाठी दिले जाते.
पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर धनंजय मुंडे हे यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर आहेत. अशा स्थितीत परळी मतदारसंघात यंदा विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार नाही.
पंकजा मुंडे यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत परळीत दोन वेळा विजय मिळवला होता. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा ३०,७०१ मतांनी पराभव केला होता. परिणामी पंकजा यांची विजयाची हॅटट्रिक हुकली होती.
गेल्या पाच वर्षांपासून पंकजा आणि धनंजय या भाऊ आणि बहीणीतील राजकीय मतभेद तीव्र होते. मात्र महायुतीच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) सरकारमध्ये सहभागी झाल्याने दोघांचे एकमेकांविरोधातील आरोप-प्रत्यारोप थांबले.
परळीतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात धनंजय अपयशी ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विधानसभेचे उमेदवार देशमुख यांनी केला आहे. स्थानिक जनता भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात असल्याचा आरोपही देशमुखांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, लोकसभा निवडणुकी दरम्यान जातीचे राजकारण हे एक विपर्यास ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणासाठी माझा लढा विचारात घेतला गेला नाही. आरक्षण हा त्यावेळी एकमेव मुद्दा नव्हता. शेतकऱ्यांमधील काही प्रमाणातील असंतोषासह इतरही काही कारणे होती. लोकसभेसारख्या सार्वत्रिक निवडणुकीत अस्तित्वात असलेल्या कोटा आंदोलनाची तीव्रता तुलनेत आता कमी झाली आहे. - धनंजय मुंडे