महाराष्ट्र

राज्य परीक्षेचे पेपर यूट्युबवर प्रसारित; तीन खासगी चॅनेल्सवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या परवानगीशिवाय इयत्ता ३ री ते ९ वीच्या नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे पेपर व त्यांची उत्तरे यूट्युबवर प्रसारित केल्याप्रकरणी तिन्ही खासगी यूट्युब चॅनेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या परवानगीशिवाय इयत्ता ३ री ते ९ वीच्या नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे पेपर व त्यांची उत्तरे यूट्युबवर प्रसारित केल्याप्रकरणी तिन्ही खासगी यूट्युब चॅनेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चाचणी ६ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार असून, परीक्षेआधीच काही पेपर बाहेर आल्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार ‘कैलासन सर मॅथ्स’, ‘म मराठी’, व ‘एस.जे. ट्यूशन क्लासेस’ या तीन यूट्युब चॅनेल्सवर ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेबाराच्या सुमारास चाचणीचे पेपर व उत्तरे प्रसारित करण्यात आली होती. याप्रकरणी शैक्षणिक परिषदेच्या सहाय्यक संचालक संगीता प्रभाकर शिंदे (५०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

राज्य शासनाने २०२१ पासून ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची मूल्यांकन चाचणी सुरू केली आहे. २०२५ मधील चाचणीसाठी परीक्षेचे पेपर १७ ते ३१ जुलै दरम्यान खासगी कार्गो कंपनीमार्फत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले होते. मात्र, ५ ऑगस्टच्या मराठी आणि ७ ऑगस्टच्या गणित विषयाचे पेपर आधीच प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधित यूट्युब चॅनेल्सवर माहिती तंत्रज्ञान कायदा व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंभीर असल्याने यामध्ये दोषी ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली