बनावट प्रमाणपत्रांचे डॉक्टर रॅकेट उघड; पाच जणांना अटक 
महाराष्ट्र

बनावट प्रमाणपत्रांचे डॉक्टर रॅकेट उघड; पाच जणांना अटक

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे मिळवून देत डॉक्टर बनविणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, २२ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासाच्या कक्षेत आले आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे मिळवून देत डॉक्टर बनविणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, २२ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासाच्या कक्षेत आले आहेत.

परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. मात्र, आरोपींनी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे आणि एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केल्याची कागदपत्रे तयार केली. या आधारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तपासादरम्यान बुलढाणा येथून दोन डॉक्टरांना, नाशिकमधून राहुल पाटील, मध्य प्रदेशातून धर्मेंद्र आणि उत्तर प्रदेशातून शुभम सिंग यांना अटक केली. विद्यार्थ्यांकडून १५ ते २० लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याचा संशय असून, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याचीही शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वाद : पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड