कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेतली. 
महाराष्ट्र

सिंगापूरच्या धर्तीवर जागतिक कौशल्य केंद्र; युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार - मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेतली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे.

प्रशिक्षणाची संधी

जगभरातल्या उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाचा सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस या संस्थेत समावेश असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची संधी, तिथले आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, एआय तंत्रज्ञान तसेच औद्योगिक व्यवस्था आणि सेवा याबाबतच्या प्रशिक्षणाची संधी या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या युवकांना मिळणार आहे.

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी

‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा; अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

Nashik : आश्रमशाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याचा उपचाराअभावी मृत्यू; मृतदेह मुख्याध्यापकांच्या टेबलवर आणून निषेध