राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; थकीत महागाई भत्ता देण्यास मंजुरी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; थकीत महागाई भत्ता देण्यास मंजुरी

राज्य सरकारने पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी देण्यास मंजुरी दिली. शासनाने निवृत्त अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्येही दोन टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर केली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारने पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ तसेच जानेवारी २०२६ या तीन महिन्यांची थकबाकी मे महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे.

या थकबाकीपोटी राज्याच्या तिजोरीतून सुमारे ८०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शासनाने निवृत्त अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्येही दोन टक्के महागाई भत्ता वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून ६० टक्के दराने सुधारित महागाई भत्ता मिळणार असल्याचे वित्त विभागाने जाहीर केले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने तीन स्वतंत्र शासन निर्णय जारी केले आहेत.

लोकप्रतिनिधींच्या वेतनात ५० टक्के कपात करा! महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी

BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले

डिजिटल माध्यमातून सिनेमा पाठवला तरी तो सॉफ्टवेअर नाही! धर्मा प्रॉडक्शनला हायकोर्टाचा दिलासा

एसटीमध्ये NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच मिळणार

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही