शिंदेंची मोफत साडी योजना गुंडाळली; वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय जारी  
महाराष्ट्र

शिंदेंची मोफत साडी योजना गुंडाळली; वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय जारी

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सुरू केलेली मोफत साडीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाळली आहे.

Swapnil S

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सुरू केलेली मोफत साडीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंडाळली आहे. वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

मोफत साडीची योजना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, वयोश्री, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन, शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीकविमा अशा अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजना एकापाठोपाठ बंद केल्या. आता अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी देण्याची योजनाही बासनात गुंडाळण्यात आली आहे.

कालावधी पूर्ण होण्याआधीच योजना बंद

योजनेच्या अंतर्गत राज्य यंत्रमाग महामंडळाने १ साडी ३५५ रुपयांना खरेदी केली. तसेच या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आला. ही योजना २०२३ ते २०२८ अशा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र, योजेनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ती बंद करण्यात आली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग