महाराष्ट्र

जिमखान्याच्या मनमानीला बसणार चाप; धोरण बदलासाठी अभ्यासगटाची नेमणूक

राज्यात सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या जिमखाना धोरणाच्या पुनर्विलोकनासाठी एका अभ्यासगटाची नेमणूक करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात सरकारी जमिनीवर उभ्या राहिलेल्या जिमखाना धोरणाच्या पुनर्विलोकनासाठी एका अभ्यासगटाची नेमणूक करण्यात आली आहे.

कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या या अभ्यासगटात चार सदस्यांचा समावेश असून हा गट जिमखाना धोरणात बदल सुचवणार आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सभासदत्व नाकारणाऱ्या, सभासद होण्यासाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारणाऱ्या आणि कारभारात पारदर्शकतेचा अभाव असलेल्या जिमखान्याच्या मनमानीला चाप बसणार आहे.

राज्य सरकारने मुंबई शहर, उपनगरसह संपूर्ण राज्यात जिमखानासाठी सरकारी जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या आहेत. जिमखाना भाडेपट्ट्याचा कालावधी हा १५ ते ३० वर्षांचा आहे. जिमखान्याकडून रेडिरेकनर मूल्यांकनाच्या १० टक्के रक्कमेच्या ०.१ टक्के इतके वार्षिक भाडे आकारले जाते. भाडेपट्ट्यात सवलती मिळवणाऱ्या या जिमखान्यानाबद्दल अनेक तक्रारी आहेत. महसूल विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

ओबामांनी 'मोठी चूक' केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप; UFO आणि एलियन्सशी संबंधित फाइल्स जाहीर करण्याचे दिले आदेश

Mumbai : आईने वाढवलेल्या मुलाला वडिलांचे नाव, जातीची सक्ती नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

गैरवापर करणाऱ्यांना करा ‘खामोश’; शत्रुघ्न सिन्हा यांची उच्च न्यायालयात धाव

गौरी पालवे आत्महत्या प्रकरण : अनंत गर्जे याच्या जामिनावर निर्णय राखीव

Aviation Safety Lapse: विमान तपासांच्या ९ नोंदी अधिकृत रेकॉर्डमधून ‘गहाळ’; तीन वर्षांत केवळ २३ टक्के प्रकरणांचे तपास पूर्ण