Freepik
महाराष्ट्र

Maharashtra Heatwave: महाराष्ट्र तापला! अकोल्यात सर्वाधिक उष्ण तापमानात; जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम केले लागू

Tejashree Gaikwad

Maharashtra's Vidarbha Region Weather: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले (Akola Hottest City) आहे, ज्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शनिवारी ३१ मे पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम १४४ लागू केले आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पारा ४५ वरती

महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला शहरात शुक्रवारी ४५.८ अंश सेल्सिअस आणि शनिवारी ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे या महिन्यातील शहरातील मोसमातील सर्वोच्च तापमान आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या आधी २६ मे २०२० रोजी, अकोला हे ४७.४ अंश सेल्सिअस तापमानात (मध्य प्रदेशातील खरगोननंतर) देशातील दुसरे सर्वात उष्ण शहर होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिले?

आदेशात म्हटले आहे की, कामगारांना पंखे, पिण्याचे पाणी आणि शेड उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसाठी खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळा बदलणे आणि लोकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविणे. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये, असेही आदेशात म्हटले आहे.

उष्माघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा इतर उपकरणांची व्यवस्था, पुरेसे पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार पेटी यांची व्यवस्था करणे ही आस्थापना मालकाची जबाबदारी असेल. खाजगी कोचिंग क्लास सकाळी १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर ठेवावेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वर्ग सुरू ठेवायचे असतील तर कोचिंग सेंटरमध्ये पंखे, कुलरची व्यवस्था करावी.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त