प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

राज्यात बुधवारपासून वादळी पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. बुधवारी कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात...

Swapnil S

मुंबई : 'शक्ती' चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर जाणवला नसला तरी नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात काही अंशांनी वाढ झाली असून आता ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. मात्र बुधवारपासून पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवार ते शनिवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेत.

सध्याच्या अंदाजानुसार, वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. तुलनेत खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. बुधवारी कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काढणी केलेली धान्ये, कडधान्ये आणि फळपिके सुरक्षित ठिकाणी ठेवातीत. शेतातील पीके झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास