How to check Maharashtra 12th Results: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने HSC अर्थात बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी, महाराष्ट्र मंडळातर्फे २ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा १५४ विषयांसाठी घेण्यात आली होती, यापैकी विद्यार्थ्यांनी २६ विषयांमध्ये पूर्ण गुण अर्थात १०० टक्के लागला आहे. यावर्षी महाराष्ट्रात १४,३३,३३१ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी १४,२३,९२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यातील १३,२९,६८४ उत्तीर्ण झाले. यंदाची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.३७ टक्के इतकी आहे. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका दुपारी १ वाजेपासून mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार आहे.
परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
> तुमचे ग्रेड जाणून घ्या
७५% आणि त्याहून अधिक - फरक
६०% आणि त्याहून अधिक - प्रथम विभाग
४५% ते ५९% - द्वितीय विभाग
३५% ते ४४% - उत्तीर्ण ग्रेड
३३% च्या खाली — अयशस्वी
> १.९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाले डिस्टिंक्शन, जाणून घ्या ग्रेडनुसार निकाल
डिस्टिंक्शन: १९०५७०
ग्रेड I: ४८०६३१
ग्रेड II: ५२६४२५
> पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की २०२४ बोर्डाच्या निकालांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसण्याची गरज आहे ते २७ मे २०२४ पासून ऑनलाइन फॉर्म भरू शकतील. यामुळे जे नियमित परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत त्यांना त्यांचे गुण सुधारण्याची अतिरिक्त संधी मिळेल.
> विभागनिहाय निकाल
कोकण : ९७.५१%
पुणे : ९४.४४%
कोल्हापूर : ९४.२४%
अमरावती : ९३%
संभाजीनगर : ९४.०८%
नाशिक : ९४.७१%
लातूर : ९२.३६%
नागपूर : ९३.१२%
मुंबई : ९१.९५%
> संभाजी नगर विभागातील एका विद्यार्थिनीला बारावी बोर्डच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
> बारीवीच्या अंतिम परीक्षेत ८७८२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.
> पाच शाखांपैकी विज्ञान शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
> मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्के जास्त आहे. मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.४४% तर ९१. ६०% मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
> विज्ञान शाखा : ९७.८२ टक्के, कला शाखा: ८५.८८ टक्के, वाणिज्य शाखा: ९२.१८ टक्के व्यावसायिक (व्होकेशनल): ८७.७५ टक्के आणि आयटीआय (ITI) ८७. ६९ टक्के असा निकाल यंदा लागला आहे.
> महाराष्ट्र बोर्डने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेदरम्यान फसवणुकीच्या (चीटिंग करण्याच्या) ३१३ केसेस नोंदवली गेली आहेत आणि डमी विद्यार्थ्यांची एकही केस नोंदली गेली नाही.
> विद्यार्थ्यांनी २६ वेगवेगळ्या विषयांमध्ये पूर्ण गुण अर्थात १०० गुण मिळवले आहेत.
> पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारत ९७.९१ टक्के उत्तीर्ण निकालासह सर्वोत्तम कामगिरी करणारा विभाग ठरला आहे.
> मुंबईतील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१९५ टक्के आहे, जी महाराष्ट्र बोर्डाच्या सर्व विभागांमध्ये सर्वात कमी आहे.
ऑनलाईन निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. mahresult.nic.in २. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. http://results.targetpublications.org
कसा बघता येईल निकाल?
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल २०२४ पाहण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला निकाल बघण्यासाठीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
निकाल पहा असं लिहलेल्या बटणावर क्लिक करा.
यानंतर, तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. या मार्कशीटची प्रत तुम्ही तिथून डाउनलोड करू शकाल.