प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

राज्यातील ITI चे आधुनिकीकरण; पहिल्या टप्प्यात तीन ITI चा समावेश; विद्यमान अभ्यासक्रमात होणार सुधारणा

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण होणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे तसेच नवीन अभ्यासक्रमासह विद्यमान अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण होणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे तसेच नवीन अभ्यासक्रमासह विद्यमान अभ्यासक्रमातही सुधारणा करण्यात येणार आहे.

कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम-सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार आहे. यामुळे राज्यातील आयटीआयचे रूप पालटणार आहे. या आधुनिकीकरणामुळे तरुणांना विविध क्षेत्रात दर्जेदार व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेची पुढच्या वर्षात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेकरिता केंद्र सरकारचा ५० टक्के राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के निधी असेल.

सरासरी चार अभ्यासक्रम सुरू करणार

एका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत तर दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. स्पोक आयटीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत तर आठ अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजीविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना मिळणार शुद्ध पाणी; भांडुप संकुलात दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लांबणीवर पडण्याची चिन्हे; यंदाचा अर्थसंकल्प ८२ हजार कोटींच्या घरात जाणार

शरद पवार पुन्हा सार्वजनिक कार्यात सक्रिय; प्रदूषित नीरा नदीचा आकस्मिक आढावा

सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री