दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर | प्रातिनिधिक छायाचित्र  
महाराष्ट्र

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये परीक्षा; वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील नऊ विभागांमध्ये होणाऱ्या इयत्ता १२वी आणि इयत्ता १०वी परीक्षांचे फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्यातील नऊ विभागांमध्ये होणाऱ्या इयत्ता १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) आणि इयत्ता १०वी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षांचे फेब्रुवारी-मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

या परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केल्या जाणार आहेत.

या वेळपत्रकामुळे आता महाविद्यालय आणि शाळा तयारीला लागल्या आहेत.

अधिकृत माहिती

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आजपासून पाहता येणार आहे.

बारावी (HSC) परीक्षा वेळापत्रक

लेखी परीक्षा: मंगळवार, १० फेब्रुवारी ते बुधवार, १८ मार्च २०२६

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: शुक्रवार, २३ जानेवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.

दहावी (SSC) परीक्षा वेळापत्रक

लेखी परीक्षा: शुक्रवार, २० फेब्रुवारी ते बुधवार, १८ मार्च २०२६

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: सोमवार, २ फेब्रुवारी ते बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६, यामध्ये शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या सूचना

मंडळांच्या संकेत स्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही माहितीसाठी आहे असे मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी यानंतर छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ व्हावे. मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे. अन्य संकेत स्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने किंवा सोशल मीडिया किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, असे आवाहन मंडळाने केले आहे. अशा अनधिकृत माहितीवरून होणाऱ्या नुकसानीसाठी मंडळ जबाबदार राहणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांनो लक्ष द्या! मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, 'या' भागांवर परिणाम

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण