एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट; प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवटच 
महाराष्ट्र

एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट; प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवटच

महाराष्ट्र एसटी महामंडळातील १७ अकार्यकारी अधिकाऱ्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असली, तरी कामाच्या स्वरूपातील विविधतेमुळे तपास प्रक्रियेला विलंब होत आहे. दरम्यान, कारवाई लांबत असल्याने संबंधित अधिकारी अद्याप मोकाट असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : एसटी महामंडळातील विविध विभागामध्ये भ्रष्टाचार तसेच इतर आरोप असलेल्या १७ अकार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाने समिती नेमली आहे. मात्र आरोप असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप वेगळे असल्याने समितीतील सदस्य अधिकाऱ्यांना कुणाला, कुठले काम द्यावे या बाबतीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे समितीचे काम धीम्यागतीने सुरू असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी अजूनही मोकाटच असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.

अकार्यकारी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या जबाबदारी शिवाय वर्षानुवर्षे वेतन देण्यात येत आहे. हे आर्थिक अडचणीतील एसटीसाठी संयुक्तिक नाही. आरोपा बाबतीत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना वेगळे काही काम देता येईल का? या संदर्भात चौकशी समिती गठित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली होती. त्या नंतर राज्य शासनाच्या परिवहन विभागाने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने पाच सदस्यीय चौकशी नेमली असून या समितीच्या आता पर्यंत फक्त दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. पण ही समिती सर्व समावेशक नसून ती अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अधिकारी हे वेगवेगळ्या विभागातील असल्याने प्रत्येकाच्या कामाचे स्वरूप सुद्धा वेगवेगळे आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन