मंदिरांमध्ये ‘ड्रेस कोड’ची लाट; भाविकांचा संमिश्र प्रतिसाद  AI Generated Image
महाराष्ट्र

मंदिरांमध्ये ‘ड्रेस कोड’ची लाट; भाविकांचा संमिश्र प्रतिसाद

मुंबई : महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये आता ड्रेस कोड लागू केला जात आहे. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टकडून परंपरागत आणि शालीन पोशाख घालण्याचे आवाहन भाविकांना केले जात आहे. मंदिरांचे पवित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड आवश्यक असल्याचे ट्रस्टचे म्हणणे असले तरी, या निर्णयावर भाविकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये आता ड्रेस कोड लागू केला जात आहे. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टकडून परंपरागत आणि शालीन पोशाख घालण्याचे आवाहन भाविकांना केले जात आहे. मंदिरांचे पवित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड आवश्यक असल्याचे ट्रस्टचे म्हणणे असले तरी, या निर्णयावर भाविकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील मोरेगाव आणि थेऊर, अहिल्यनगरमधील सिद्धटेक, पिंपरी-चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी व रायगडमधील खार नारंगी येथील मंदिरांचा समावेश असलेल्या चिंचवड देवस्थान ट्रस्टने नुकतीच भाविकांसाठी सूचना प्रसिद्ध केली. यामध्ये भाविकांनी मंदिरात "योग्य पोशाख" परिधान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ट्रस्टने स्पष्ट केले की हा ड्रेस कोड बंधनकारक नसून, मंदिरातील शिस्त आणि आदरभाव जपण्यासाठी केलेले नम्र आवाहन आहे. अशा प्रकारे देण्यात येणारा सल्ला-सूचना आता हळूहळू राज्यभरात आकार घेत असलेल्या एका प्रवृत्तीचा भाग वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

यावर्षी जानेवारीत, मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने एक ड्रेस कोड जाहीर केला होता. श्री सिद्धिविनायक मंदिराला दररोज हजारो भाविक भक्तिभावाने दर्शनासाठी भेट देत असतात. यांमध्ये सेलिब्रिटी आणि व्हीव्हीआयपींचीही मोठी संख्या असते.

मागील वर्षी, रत्नागिरीतील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला. प्रवेशद्वारांवर फलक लावून लोकांनी पूर्ण कपडे घालावेत आणि शरीर उघडे ठेवणारे कपडे टाळावेत, असे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने रत्नागिरीतील ११ ठिकाणी बैठकांचे आयोजन केले आणि या बैठकींमध्ये ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांनी पारंपरिक भारतीय पोशाखात येण्याचा नियम लागू करण्याचे ठरवले.

अहिल्यनगर जिल्ह्यातील किमान १६ मंदिरांमध्ये अशा प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले असून, जीन्स, स्कर्ट, शॉर्ट्स आणि उघडेपणा दर्शवणारे कपडे घालणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

या मंदिरांच्या बाहेर नोटिस बोर्ड लावलेले असून, तेथे अनुचित कपड्यांची यादी दिली आहे आणि मराठीत असे लिहिले आहे की "उघडेपणा किंवा उत्तेजकता असलेले कपडे मंदिर परिसरात परवानगीयोग्य नाहीत."

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांसारख्या उजव्या संघटनांनी हे ड्रेस कोड संपूर्ण अहिल्यनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांनी राज्य सरकारकडेही शिर्डी साईबाबा मंदिर आणि शनी शिंगणापूर मंदिर यांसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याची मागणी केली आहे.

नागपूरमधील चार मंदिरांमध्ये, दोन वर्षांपूर्वी ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्यात आली होती – धंतोळीतील गोपाळकृष्ण मंदिर, बेलोरीतील संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, कन्होळीबाराचे बृहस्पती मंदिर आणि हिलटॉप येथील दुर्गामाता मंदिर.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनिल घणवट यांनी सांगितले की, "जळगावमधील एका बैठकीत महाराष्ट्र मंदिर ट्रस्ट परिषदेने हा निर्णय घेतला. मंदिर परिसरात येताना भाविकांनी आपत्तिजनक पोशाख टाळावेत अशी अपेक्षा आहे."

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video