महाराष्ट्र

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबरला; ठाण्यात १७,०३३ उमेदवार, ३२ परीक्षा केंद्रांवर व्यापक तयारी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून १७,०३३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत.

टीईटी परीक्षा ही शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता असून उमेदवारांच्या अध्यापन कौशल्य, बालविकास व शैक्षणिक मानसशास्त्र, विषयज्ञान आणि एकूण क्षमतेचे मूल्यांकन या परीक्षेद्वारे केले जाते. राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा २००९ (RTE Act) अंतर्गत ही परीक्षा अनिवार्य आहे.

ठाणे जिल्ह्यातील परीक्षेसाठी पेपर-१ साठी ७,८०३ आणि पेपर-२ साठी ९,२३० उमेदवारांनी अर्ज केला आहे. पेपर-१ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० व पेपर-२ दुपारी २.०० ते ४.३० या वेळेत होईल. शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन सर्व परीक्षा केंद्रांवरील आवश्यक भौतिक सुविधा व बैठक व्यवस्थेची तपासणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेट देऊन आसनव्यवस्था, भौतिक सुविधा व परीक्षेसाठी आवश्यक उपकरणांची पाहणी केली आहे.

परीक्षा नियोजन व सुरक्षा व्यवस्था

२७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनीही सविस्तर मार्गदर्शन करून तयारीचा आढावा घेतला. या परीक्षेसंदर्भात सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, फ्रिस्किंग व बायोमेट्रिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच स्वतंत्र जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करून सर्व केंद्रांशी सातत्याने संपर्क सुरू आहे.

सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्र वेळेवर डाउनलोड करावे, केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुरक्षा, आसनव्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण असून टीईटीद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षक प्राप्त होण्यास मदत होत आहे. - बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती