महाराष्ट्र

World Environment Day : राज्यात यंदा १० कोटी वृक्षांची लागवड; मुख्यमंत्र्यांची घोषणा, 'पीडब्ल्यूडी ट्री प्लॅन्टेशन अँड मॉनिटरिंग' अ‍ॅपचे लोकार्पण

World Environment Day : राज्यातील झाडांची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Swapnil S

मुंबई : राज्यातील झाडांची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, झाडांची लागवड केल्यानंतर ती अधिकाधिक जगावी यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. देशात सर्वाधिक वनाच्छादन वाढविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील ३३ टक्के वनाच्छादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील वीस वर्षे हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हे अभियान मोहिम स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी व ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्षारोपणात किमान दिड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करून पारदर्शकपणे कामे होण्याकडे लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी दर्जेदार रोपे निश्चित करावीत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा. तसेच सामाजिक संस्थांनाही यामध्ये सहभागी करून घ्यावे. दहा कोटी झाडे लागवडीच्या मोहिमेच्या यशाचे गमक हे चांगली नर्सरी आहे. दर्जेदार रोपे मिळावीत यासाठी नर्सरी तयार करणे आवश्यक आहे.

मंत्रालयात पिशवीसाठी वेंडिंग मशीन लावणार

पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर एकल वापरासाठीच्या प्लास्टिकविरुद्धच्या मोहिमेत मंत्रालयात येथे कापडी पिशवीसाठी वेंडिंग मशीन लावण्याचा विचार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंत्रालयातील सर्व विभागांच्या कार्यालयांमध्ये एकल वापरासाठीच्या प्लास्टिक वस्तू जमा करून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले. राज्य पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्रालयात गुरुवारी रोजच्या अभ्यागतांसाठी उदाहरण म्हणून कापडी पिशवीसाठी वेंडिंग मशीन बसवण्याचे नियोजन करत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत विभागाने आदेश जारी केला असून सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयांमध्ये मंत्रालयामधील त्रिमूर्ती ठिकाणी एकल वापरासाठीच्या प्लास्टिक वस्तू जमा करण्यास सांगितले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

विधिमंडळ, सरकार, प्रशासनाचे नाते काय?

लव्ह जिहाद : भ्रम आणि वास्तव