राज्यात घोंघावतेय जलसंकट! पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

राज्यात घोंघावतेय जलसंकट! पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट

यंदा राज्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने जलसंकट गडद झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये २५ नोव्हेंबर २०२६ रोजी केवळ ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Swapnil S

मुंबई : यंदा राज्यात समाधानकारक पाऊस न बरसल्याने जलसंकट गडद झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये २५ नोव्हेंबर २०२६ रोजी केवळ ६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९० टक्के होता. म्हणजेच वर्षभरात पाणीसाठ्याच्या टक्केवारीत तब्बल २८ टक्क्यांची घट झाली.

जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी सादर केलेल्या अहवालातून राज्यातील पाणीसाठ्याचे हे चित्र समोर आले आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण ३ हजार ४२ धरणांची प्रकल्पीय उपयुक्त साठवण क्षमता १ हजार ४४७.६३ टीएमसी आहे. त्यापैकी सध्या ८९४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच दिवशी १ हजार ३०१.९३ टीएमसी म्हणजेच ९० टक्के पाणीसाठा होता. मोठ्या धरणांमध्ये ६८ टक्के, मध्यम धरणांमध्ये ५६ टक्के, तर लघु धरणांमध्ये अवघा ३६ टक्के पाणीसाठा आहे. लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्याचे स्पष्ट होते.

मराठवाड्यातील स्थिती अधिक गंभीर

महसूल विभागनिहाय आकडेवारी पाहता मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील ९३१ धरणांमध्ये केवळ ३४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ८९ टक्के होता. म्हणजेच यंदा तब्बल ५५ टक्क्यांची घट झाली आहे. अमरावती विभागात ५१ टक्के, नागपूर विभागात ५५ टक्के, नाशिक विभागात ७१ टक्के, पुणे विभागात ७२ टक्के, तर कोकण विभागात ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकण विभागाची स्थिती तुलनेने समाधानकारक असली तरी राज्याच्या एकूण पाणीसाठ्यात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

धाराशीव, लातूरमध्ये नियोजनाचे आव्हान

जिल्हानिहाय आकडेवारीत जालना जिल्ह्यात अवघा ५ टक्के, धाराशिवमध्ये ४ टक्के, बीडमध्ये ८ टक्के, लातूरमध्ये ९ टक्के, तर परभणीमध्ये ११ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणी नियोजनाचे आव्हान अधिक गंभीर झाले आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राखण्यात येत आहेत. त्यानुसार सर्व प्रकारचे नियोजन करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन; समितीला ६० दिवसांत निर्णय द्यावा लागणार, अर्जापासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल

Mumbai : पश्चिम उपनगरातील प्रवास सुसाट; पश्चिम उपनगरातील प्रवास सुसाट

४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

जळगावच्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

राहुल गांधींविरोधातील चौकशीचे आदेश रद्द