महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त, तांडेलसह सात खलाशी ताब्यात X / @airnews_mumbai
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी; कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त, तांडेलसह सात खलाशी ताब्यात

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली.

Swapnil S

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील ‘सुलतान’ या ट्रॉलर नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री देवगडसमोरील समुद्रात ही नौका जप्त करण्यात आली असून, तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुणगे किनाऱ्यापासून पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका दिसताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ‘सुलतान’चा परवाना केवळ विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (EEZ) वैध असल्याची माहिती विभागाने दिली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारीचा अधिकार नसतानाही नौका येथे मासेमारी करत असल्याचे समोर आले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भारत धर्मनिरपेक्षच! ‘दिया’ची चित्रफीत पुनःप्रसारित करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आंदोलन स्थळी अमर्याद काळ ठिय्या नको; इतरांनाही निदर्शनांचा घटनात्मक अधिकार, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

Mumbai : पालिका आयुक्तांवर कारवाईचा बडगा

५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर; पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन

Diwali 2026 : कमी वेळेत घर सजवण्याचा नवा ट्रेंड; सजावटीसाठी प्लास्टिकच्या रंगीबेरंगी स्टिकरना पसंती, सजावटीला आधुनिक पर्याय