महाराष्ट्र

ही भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

कोल्हापूरमधील चंदगड येथील सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे खरे वारसदार नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई :

कोल्हापूरची शाहू महाराजांची गादी ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादी विषयी महाराष्ट्रातील जनतेला अपार आदर आणि श्रद्धा आहे. निवडणुकीत पायाखालची वाळू सरकतेय, हे समजल्यावर महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक केली जात आहे. शाहू महाराज हे आधीपासून सामाजिक कार्यात आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी संजय मंडलिक यांनी वापरलेली भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी दिला.

कोल्हापूरमधील चंदगड येथील सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे खरे वारसदार नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.  त्यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शाहू महाराज हे वारसदार नाहीत, मग संजय मंडलिक वारसदार आहेत का? असा सवाल करतानाच संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापुरातील राजकारणात काम करत होते. कोल्हापूरची शाहू महाराजांची गादी ही शिवाजी महाराजांची गादी आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणे हे लक्षण चांगलं नाही, असे राऊत म्हणाले. दरम्यान, प्रचारादरम्यान महायुतीच्या उमेदवारांकडून मतदारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि आमिषांची देशाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी करत हे चित्र लोकशाहीसाठी मारक असल्याचे राऊत म्हणाले.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

Mumbai : 'बॉम्बे'ची 'मुंबई' कधी झाली? काय आहे या नावामागची गोष्ट? जाणून घ्या

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? तुरुंगात विष दिल्याचा आरोप; कुटुंबियांवर लाठीचार्ज

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

डोंबिवली : भीक मागणाऱ्या तरुणीला दिला आसरा; पाच वर्षांनी केला तिचा खून, खाडीत सुटकेसमध्ये आढळला मृतदेह, धक्कादायक Video समोर