कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

Swapnil S

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद सव्वा वर्षासाठी तर सभापतीची ४ पदे एक वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला. या फॉर्म्युल्यानुसार ५ वर्षात जिल्हा परिषदेला ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती मिळणार आहेत. महायुतीच्या ५१ पैकी २८ सदस्यांना ५ वर्षात संधी मिळणार आहे. १७ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहे. पण अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे.

जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी २०, भाजप १२, शिवसेना ९, शाहू आघाडी ४, जनसुराज्य ५ आणि १ अपक्ष महायुतीकडे आहे. १७ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि माजी आमदार सुजीत मिणचेकर बैठकीला उपस्थित होते.

महायुतीच्या ५१ सदस्यांपैकी २८ सदस्यांना ५ वर्षात पदे मिळणार आहेत. उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन समिती राहील. एकूणच महायुतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सभापतीपद वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Tirupati Blast : फार्मा कंपनीत मोठी दुर्घटना! बॉयलरच्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी; बचावकार्य सुरू, VIDEO

CNG Car Blast : गॅस भरतानाच कारचा भीषण स्फोट; थरकाप उडवणारा VIDEO, वाहनचालकांनो 'या' चुका टाळा, नाहीतर...

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय